मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द

मुंबई: करोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात होत असूनया परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मनसेनं गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असूनसध्याची परिस्थिती पाहता सरकारनं या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही मनसेनं आहे.राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता महत्वाची असून, या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना सूचवल्या असून, त्या पुरेशा नाहीत, याकडेही राज यांनी लक्ष वेधलं आहे. माल्स, व्यायामशाळा, चित्रपटगृह करण्याचा निर्णय घेतला आहे, काही शहरांतील शाळा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण चार-पाच शहरांतील शाळा बंद करून कसं चालणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत लोकलनं मोठ्या संख्येनं लोक प्रवास करतात. मोठी गर्दी होते. बसस्थानक, बाजारपेठा यांमध्ये मोठी गर्दी होते. त्याबाबत काय करणार? सरकारनं त्यावर काय उपाय योजले आहेत, असाही प्रश्न ठाकरे यांनी आहे.पुढील काही आठवड्यात राज्यात काही निवडणुका होत आहेत. महापालिकांच्या निवडणुका होणार आहेतत्यासाठी बैठका, मेळावे आणि सभा घेतल्या जातात. गर्दी होते. त्यामुळे सरकारनं गर्दी टाळण्यासाठी निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. करोनाच्या रुपानं जगाववर कोसळलेलं संकट दूर होवो, तसंच आर्थिक संकटही टळो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.