मुंबई : महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आजच्या घडीला २६ वर गेली आहे. यात पुण्यात १०, मुंबईत ५, नागपूरमध्ये ४, पनवेलमध्ये १, कल्याणमध्ये १, ठाण्यात १ यवतमाळमध्ये २, कामोठे या ठिकाणी १ असे एकूण २६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. । दरम्यान, आज नावने आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ४ जण हे पुणे येथील पहिल्या २ बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेले होते.त्यांपैकी १ रुग्ण अहमदनगरला, २ यवतमाळला तर १ जण मुंबईतील रुग्णालयात भरती आहे. तसेच, या चौघांशिवाय मुंबईत आणखी ४ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबईहून आलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर, मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून भारतात परतलेले आहेत.याशिवाय, नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेला आणि कतारहून देशात परतलेला ४३ वर्षीय व्यक्ती सुद्धा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आज कोरोना बाधित आढळलेल्या ९ रुग्णांपैकी फक्त १ जण महिला आहे. तसेच, राज्यात आज १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाग्रास्तांची संख्या २६ वर